Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting : नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी ५ वर्ष; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे...

Cabinet Meeting : नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी ५ वर्ष; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय

मुंबई । Mumbai

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत (Cabinet Meeting) महायुती सरकारने (Mahayuti Govt) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते.

- Advertisement -

येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा यांना उभं करणं मोठी चूक, अजित पवारांचं वक्तव्य

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले संक्षिप्त निर्णय

पशूसंवर्धन व दुग्धविकास विभाग

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार

१४९ कोटीस मान्यता

महसूल विभाग

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय

लाखो नागरिकांना लाभ

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

हे ही वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

सहकार विभाग

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथील

वैद्यकीय शिक्षण विभाग

शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता

हे ही वाचा : हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

नगरविकास विभाग

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष

ऊर्जा विभाग

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...