Monday, April 28, 2025
Homeक्रीडाराजस्थान रॉयल्सचे हौसले बुलंद

राजस्थान रॉयल्सचे हौसले बुलंद

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएल स्पर्धेत बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

राजस्थान संघाने यंदाच्या हंगामात सलामीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांचे हौसले बुलंदीवर आहेत. आता कोलकात्यावर मात करून विजयी हॅट्रिक करण्यासाठी रॉयल्स काय रणनीती आखातात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राजस्थान संघासाठी जमेची बाजू म्हणजे संजू सॅमसन , कर्णधार स्टीव्ह स्मीथ चांगल्या फॉर्मात आहेत. त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.

गतसामन्यात पंजाबविरुद्ध गोलंदाज राहुल तेवतीया याने केलेल्या ताबडतोड अर्धशतकांमुळे रॉयलसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. शिवाय सलामी फलंदाज जोस बटलरला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नव्हती त्याला आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे.

दुसरीकडे मुंबईविरुद्ध सलामी लढतीत पराभव पत्करल्यानंतर कोलकात्याने हैद्राबादविरुद्ध दमदार पुनरागमन केले होते.

केकेआर च्या भेदक गोलंदाजीमुळे हैद्राबादला १४३ धावांवर रोखण्यात कोलकात्याला यश आले होते. संघाने ७ विकेट्सने विजय मिळवून विजयाचे खाते उघडले होते.

सलामीवीर शुभमन गिलने झळकावलेल्या झुंजार अर्धशतकामुळे कोलकात्याने विजय मिळवला होता. आता राजस्थानविरुद्ध विजयी पताका फडकावण्यासाठी कोलकाता संघ सज्ज झाला आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...