नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
संपूर्ण जगभरात करोना (corona) विषाणूने थैमान घातले आहे. करोनाकाळात मास्क (mask) व सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर आणि सोशल डिस्टन्सिंग (Social distance) पाळणे हे महत्वाचे आहेच पण प्रत्येक नागरिकाने करोना प्रतिबंधक लस (corona vaccine) घेणेदेखील तितकेच महत्वाचे आहे…
करोना लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी आज (दि. १६) गुगलने एक खास गुगल डूडल प्रसिद्ध केले आहे. गुगल डूडलचे प्रत्येक अक्षर लस घेण्याचा सल्ला देत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच आजच्या गुगल डूडलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘माझ्या जवळपासचे COVID लसीकरण केंद्र’ (Covid Vaccine Near Me) याबाबत माहिती दिली जात आहे.
दरम्यान, भारतात सध्या कोवॅक्सिन (covaxin), कोविशिल्ड (covishield), आणि स्फुटनिक (sputnik) लस उपलब्ध आहे. नागरिकांनी लस जरी घेतली तरी नियमित मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी अद्याप करोना प्रतिबंधक लस घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण (vaccination) करणे गरजेचे आहे.