Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यालव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आज मोर्चा

लव्ह जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आज मोर्चा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील काही हिंदुत्ववादी संघटना लव्ह जिहादच्या विरोधात आज मोर्चा काढणार आहे, तर दुसरीकडे आफताब पूनावालासह सर्व बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने शहरात फलकबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय शहरभर चर्चेला जात आहे तर दुसरीकडे शहरातील पोलीस दलावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकल हिंदू समाज नाशिकच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची चर्चा सुरू आहे. आपल्या प्रेयसीचा खून करून त्याचे तुकडे करून फेकून देण्याचा प्रकार हा अत्यंत निषेधार्थ असून समाजातील सर्व क्षेत्रातून त्याचा निषेध होत आहे. तसेच त्याला फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान या मुद्द्यावरून काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

आज सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शहरातील मध्यवर्ती शालिमार येथील बिडी भालेकर शाळा मैदानापासून मोर्चाचे आयोजन लव्ह जिहादच्या विरोधात करण्यात आले आहे. या मोर्चाचे नियोजन मागील काही दिवसांपासून सुरू होते. त्यात शहरातील जवळपास सर्व महत्त्वाच्या ठिकाणी याबाबतचे फलक लावण्यात आले आहे. दरम्यान अचानक लव्ह जिहादच्या विरोधात नाशिकमध्ये मोर्चा निघत असल्यामुळे काही मुस्लीम समाजाचे संघटना देखील अ‍ॅक्टिव्ह होऊन सर्व बलात्कारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत त्यांनी शहरात फलकबाजी केल्यामुळे शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या तसेच संमिश्र वस्ती असलेला भागात मुस्लिम समाजाच्या वतीने फलक लावण्यात आले आहे.

फलकाची चर्चा

मुस्लीम समाज की मांग. भारत देश मे महिलाहो के साथ बलात्कार करनेवालो को फौरन फाँसी दो, आफताब पुनावाला, हर्षल बालकृष्ण मोरे और ऐसे तमाम बलात्कारीयों को फाँसी दो, असे फलक लावण्यात आले आहे. तर फलकाच्या खाली मोठ्या अक्षरांमध्ये जय भारत जय संविधान असे लिहिण्यात आले आहे.

हजारो पाथर्डीकर सहभागी

इंदिरानगर । हिंदू मूकमोर्चामध्ये पाथर्डी व इंदिरा परिसरातून हजारोच्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. या संदर्भात अनेक ठिकाणी मोर्चा संबंधित जनजागरण करण्यात येऊन आज ( दि. 28) होणार्‍या मूक मोर्चामध्ये सामील होण्यासाठीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पाथर्डी भागातून सकाळी 8.30 वाजता पाथर्डी गावातील मारुती मंदिर, पाथर्डी गाव सर्कल, अंजना लॉन्स, पांडुरंग चौक, वक्रतुंड हॉस्पिटल, प्रशांत नगर, शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाथर्डी फाटा येथून दहा वाजता बीडी भालेकर हायस्कूल मैदान, शालिमार चौक, सारडा कन्या विद्यालय, गाडगे महाराज पुतळा, रविवार कारंजा, यशवंत शाळा, मेहर व शिवतीर्थ येथे त्याची सांगता होणार आहे. यासाठी हजारो सकल हिंदू समाज यात सहभागी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या