Friday, May 31, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीचा आजचा पेपर रद्द; 'हे' आहे कारण

दहावीचा आजचा पेपर रद्द; ‘हे’ आहे कारण

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवी परीक्षा घेतल्या जात आहेत. दि. 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये दहावीची पुरवणी परीक्षा तर 18 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत बारावीची पुरवणी परीक्षा होत आहेत.

- Advertisement -

मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने बोर्डाकडून आजचा दहावीचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा पेपर सुधारीत वेळापत्रकानुसार गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान होणार आहे.

आज दहावीचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होता, मात्र अतिवृष्टीच्या इशारामुळे आता हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत बोर्डाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या