Wednesday, October 16, 2024
HomeराजकीयMahayuti Press : आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलली; कारण काय?

Mahayuti Press : आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलली; कारण काय?

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच पुढील पत्रकार परिषदेचा दिनांक आणि स्थळ कळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्यातील विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election 2024) वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील निवडणूक किती टप्प्यात होणार, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या