Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाTokyo Paralympics : अवनी लेखराने पटकावलं दुसरं पदक, ठरली पहिली भारतीय

Tokyo Paralympics : अवनी लेखराने पटकावलं दुसरं पदक, ठरली पहिली भारतीय

दिल्ली | Delhi

- Advertisement -

टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लटलूट सुरूच असून अवनी लखेरानं (Avani Lekhara) कमाल केली आहे. तिनं काही दिवसांपूर्वी शूटिंगमध्ये सुवर्ण पदक (Gold medal) पटकावलं होत. आता तिनं कांस्य पदकाची (bronze medal) कमाई केली आहे. (Avani Lekhara wins bronze)

१० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण वेध साधणाऱ्या अवनीने ५० मीटर रायफल थ्री पोझीशन SH1 प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाच स्पर्धेत देशासाठी दोन पदक जिंकणारी अवनी पहिली भारतीय खेळाडू आहे.

प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य

भारताच्या प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकलं आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदकं जिंकली होती. आता प्रवीण कुमारच्या पदकासह भारताच्या ताफ्यात ११ वं पदक जमा झालं आहे. (Praveen Kumar wins silver medal in men’s high jump)

- Advertisment -

ताज्या बातम्या