Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाTokyo Paralympics : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक, अवनी लेखराचा सुवर्णवेध

Tokyo Paralympics : नेमबाजीत भारताला सुवर्णपदक, अवनी लेखराचा सुवर्णवेध

दिल्ली | Delhi

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. स्पर्धेत अवनी लेखारा (Shooter Avani Lekhara) हिने सुवर्ण कामगिरी करत भारताला सुवर्णपदक (Goldmedal) मिळवून दिलं आहे. पॅरालिम्पिकमधील (Paralympics) भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

- Advertisement -

१० मिटर्स एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखारा हिने सुवर्णपदकाची कमाई केली. अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली.

अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक (Silver Medal) मिळवून दिलं आहे. योगेशनं ४४.३८ मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. (Yogesh Kathuniya wins Silver Medal in Tokyo Paralympics)

योगेशच्या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, योगेश कठुनिया यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. योगेशनं देशासाठी रौप्य पदक मिळवल्याचा आनंद आहे. त्याचे यश निश्चितच अनुकरण करण्यासारखे आहे आणि ते नवोदितांना प्रेरणादायी ठरेल. योगेशचं खूप अभिनंदन आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या