Thursday, June 20, 2024
Homeनाशिकलासलगावला उद्यापासून टोमॅटो लिलाव

लासलगावला उद्यापासून टोमॅटो लिलाव

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

येथील बाजार समितीच्या (Lasalgaon APMC ) मुख्य आवारावर उद्या सोमवार दि.2 पासून टोमॅटो लिलावाचा ( Tomato auction )शुभारंभ होत असल्याची माहिती बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे.

लासलगावसह परीसरातील निफाड, चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, कोपरगांव तालुक्यातील गावांमध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीने 25 वर्षापासून टोमॅटो लिलाव सुरू केले आहे.

साहजिकच टोमॅटो हंगाम सुरू होत असल्याने बाजार समितीच्या मुख्य आवारावर सोमवारपासून टोमॅटो लिलाव सुरू होत असल्याने शेतकर्‍यांनी प्रतवारी करून व 20 किलोच्या प्रति क्रेटस् मध्ये विक्रीस आणावा. लिलावानंतर लगेचच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप करून रोख चुकवती देण्यात येईल.

तसेच टोमॅटो खरेदीस इच्छुक असणार्‍या नविन व्यापार्‍यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी, शर्तींची पूर्तता केल्यास त्यांना तत्काळ परवाना देवून प्रतवारी व पॅकिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप, उपसभापति प्रीती बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह संचालक मंडळाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या