Saturday, May 25, 2024
Homeनगरटोमॅटो दरात घसरण

टोमॅटो दरात घसरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

काकडी (Cucumber), शिमला पाठोपाठ आता टोमॅटोलाही (Tomatoes) भाव न मिळाल्याने शेतकर्‍यांनी नाशिक बाजार समिती (Nashik Market Committee) आवारात अक्षरशः टोमॅटोने (Tomatoes) भरलेल्या जाळ्या फेकून देत संताप व्यक्त केला.

- Advertisement -

पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड (Sharad Chandraji Pawar Market Yard) आवारात नाशिकसह (Nashik) निफाड (Nifad), सिन्नर (Sinnar) आदी भागांतून टोमॅटो (Tomatoes) आवक होते. बुधवारी (दि.25) जवळपास 47, 300 जाळ्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार एका जाळीला अवघे 50 ते 180 रुपये बाजारभाव (Market price) मिळाला. रात्री उशिरा टोमॅटोची आवक (Tomatoes Inward) आणखी वाढल्याने सुमारे दहा ते बारा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा माल मार्केट यार्ड आवारात व प्रवेशद्वारावर टाकून संताप व्यक्त केला.

नगर जिल्ह्यातही (Nagar District) भाव कमी मिळत आहे. संगमनेरात (Sangamner) 250 ते 400 रूपये, श्रीरामपूरात (Shrirampur) 500 ते 800, राहाता (Rahata) 500 ते 1000, अकोलेत (Akole) 200 ते 1000 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या