Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची उद्या अंतिम मुदत

Nashik News : नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची उद्या अंतिम मुदत

म्हेळुस्के | वार्ताहर | Mheluske

पि एम श्रीस्कूल जवाहर नवोदय विद्यालय (Jawahar Navodaya Vidyalaya) खेडगाव येथे शैक्षणिक सत्र २०२५-२०२६या वर्षासाठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज (Online Application) करण्याची उद्या (दि.७)शेवटची मुदत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : किर्तनकारास मारहाण करून लुटले

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत चालविल्या जात असलेल्या व नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली (New Delhi) द्वारा संचलित खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ या वर्षासाठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या संपणार असून जे विद्यार्थी व विद्यार्थिनी शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे व सलग इयत्ता तिसरी,चौथी अनुक्रमे २०२२-२३, २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

त्यांचे पालक नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा जन्म १ मे २०१३ ते ३१ जुलै२०१५ या दरम्यान झालेला आहे, असे विद्यार्थी व विद्यार्थिनी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे.ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधीची संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्लीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही प्रवेश चाचणी परीक्षा दिनांक १८जानेवारी२०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रावर होणार आहे.अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया समन्वयक श्याम मदनकर ९२३६१५३१९ आणि आर.के.पराडे यांच्याशी ९८२०८७९७१० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य एस.व्ही.स्वामी यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...