Monday, November 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजउद्याचा महाराष्ट्र बंद नाही; पण काळ्या फिती बांधून राज्यभर निषेध करू -...

उद्याचा महाराष्ट्र बंद नाही; पण काळ्या फिती बांधून राज्यभर निषेध करू – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यावर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं होत . या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होत.

- Advertisement -

त्या नंतर आत्ता उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र बंद करू नये या उच्च न्यालयाच्या निर्णयाचा आदर करून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बंद करणार नसून यात उद्या सकाळी अकरा वाजेला तोंडाला काळी पट्टी बांधून व हातात काळे झेंडे घेऊन राज्यभर निषेध करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

त्याच बरोबर उच्च न्यालयाने तत्परतेने बंद बाबत निर्णय दिला आहे. त्याच प्रमाणे उच्च न्यायालयाने बदलापूरला झालेल्या घटनेबाबत न्याय देण्यास उच्च न्यायालयाने तप्तरता दाखवावी. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही. मोर्चे हडताळ यावर बंदी आहे का? लोकांनी भावना व्यक्त करू नये का. यावर घटनातज्ज्ञांनी बोललं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या