अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) आयपीएलवर सट्टा (Betting on IPL) खेळविणार्यास छापा (Raid) टाकून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुनील आरडे (वय 25, रा. बोल्हेगाव गावठाण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह स्वप्नील परवते (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. बोल्हेगाव (Bolhegav) येथील नवनाथनगरमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई (Police Action) केली. आरडेकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई गौतम नामदेव सातपुते यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ज्ञानेश्वर आरडे हा स्वप्नील परवते याच्या सांगण्यावरून राजस्थान रॉयल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे सट्टा खेळवत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक शैलेश गोमसाळे करत आहेत.