Monday, May 20, 2024
Homeनगरतोफखान्यांत जुगार अड्ड्यावर छापा

तोफखान्यांत जुगार अड्ड्यावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलिसांनी जंगुभाई तालिजवळील एका घराच्या भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 51 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 11 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर, हवालदार रमेश शिंदे, अहमद इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -

डायल 112 वर कॉल आला, सदर ठिकाणी 20 ते 30 लोक जुगार खेळत आहेत. त्यावरून पोलिसांनी संबंधीत ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 51 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजी झांबरे (वय 47, रा. वाटेफळ), बबन कोकणे (वय 54, रा. बालिकाश्रम रोड, जाधव मळा, नगर), कल्याण लोखंडे (वय 37, रा. धामणगाव, ता. आष्टी), संतोष भुस्सा (वय 36, रा. तोफखाना, नगर), अदित्य टाक (वय 25, रा. तोफखाना), किरण मुके (वय 70, रा. कल्याण रोड), योगेश नलवडे (वय 40, रा. तोफखाना), तुषार आंबेकर (वय 35, रा. माळीवाडा), गोविंद इंगळे (वय 33, रा. पाईपलाईन रोड), यशवंत ढोणे (वय 59, रा. सर्जेपुरा), नीलेश भारताल (वय 33, रा. जंगुभाई तालिमसमोर) अशी जुगार्‍यांची नावे असून त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या