त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील दुगारवाडी धबधबा (Dugarwadi waterfall) बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक सतरा वर्षीय पर्यटक (Tourist) वाहून गेल्याची घटना घडली आहे…
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ भागांत मुसळधार कोसळण्याचा अंदाज
याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि.१६) रोजी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बरेच पर्यटक दुगारवाडी धबधबा तसेच आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी याठिकाणी आले होते. त्यावेळी काल दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deovlali Camp) येथील अमित शर्मा (वय १७) हा मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समजते.
Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा; वाचा सविस्तर
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काल दुपारपासून वनविभागासह पोलिसांकडून (Police) शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळी पहाटे पाच वाजेपासून शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
बंगळुरूत आज एकता बैठक