Friday, May 24, 2024
Homeनाशिकतब्बल पाच मिनिटे सायरन वाजविल्यानंतर रुग्णवाहिकेला मिळाली जागा

तब्बल पाच मिनिटे सायरन वाजविल्यानंतर रुग्णवाहिकेला मिळाली जागा

नाशिक | Nashik

शहराच्या (Nashik City) मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधी मार्गावर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला (Ambulance) टोईंग वाहनामुळे (Towing Van) अडथळा निर्माण झाला होते….

- Advertisement -

तब्बल पाच मिनिटे सायरन आणि हॉर्न वाजविल्यानंतर संबंधित टोईंग वाहनचालकाने गाडी बाजूला घेत रुग्णवाहिकेला जागा करून दिली. महात्मा गांधी (MG Road) रस्त्यावर नेहमी अशी ट्राफिक (Traffic) करण्याचे काम हे टोईंग वाहन करत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी यांमध्ये रंगली होती.

शहरात वाहने बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांना चाप बसण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे (Traffic Department) टोईंगची कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र, सध्या टोईंग करणारी वाहने आणि गाड्या उचलनाऱ्या कर्मचाऱ्यांची मग्रुरी यामुळे नागरिकांसह इतर शासकीय विभागांची डोकेदुखी वाढत आहे. शहरातील महत्वाचा व्यावसायिक रस्ता म्हणून महात्मा गांधी रस्ता ओळखला जातो.

साधारणपणे शेकडो दुकाने असलेल्या या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने ग्राहक आणि विक्रेते असतात. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी देखील मोठ्या प्रमाणावर असते. पार्किंगची सोय नसल्याने जागा मिळेल तिथे नागरिक आपली वाहने पार्क करत असतात. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा प्रश्न तयार होऊ नये म्हणून टोईंग ची संकल्पना योजण्यात आली. मात्र, याच टोईंगच्या वाहनाने रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित ठेकेदाराने टोईंगकमी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची मग्रुरी आणि टोईंगमुळे होणारी ट्राफिक हि नित्याचीच झालेली आहे.

टोईंग वाहनामध्ये असलेले पोलीस फक्त घोषणा करण्यापुरतेच मर्यादित असतात. कर्मचाऱ्यांना वाहन उचलण्यापूर्वी गाडीचा फोटो, उचलल्यानंतर त्या ठिकाणी फोन क्रमांक लिहिणे बंधनकारक करण्यात आलेले असले तरी कोणीच असे करत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या