Friday, March 28, 2025
Homeनाशिकट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

दहिवड | वार्ताहर | Dahiwad

देवळा-मालेगाव रोडवरील खुंटेवाडी फाट्याचा बस स्टॉपसमोर दुचाकी व वाळूचा ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. अपघातात एक ठार तर एक जखमी झाला आहे…

- Advertisement -

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस नाईक ज्योती गोसावी यांनी देवळा पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. वाखारी येथील ट्रॅक्टर क्रमांक एम एच 15 डी. यू. 5309 हा ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाळू घेऊन खुंटेवाडी गावाकडून वाखारीचे दिशेला रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत होता.

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : आता शिर्डीत होणार नाईट लँडिंग

त्याचवेळी पिंपळगावकडून देवळा दिशेने येत असलेली दुचाकी एम. एच. 01 क्यू. 7266 ने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दहिवड येथील बँड काम करणारा युवक राकेश अनिल ठाकरे (18) हा जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला तर खर्डे येथील भूषण धना माळी हा त्याच्याबरोबर दुचाकी वर असलेला दुसरा युवक जखमी झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चिंचवड पोटनिवडणुकीत मविआची धाकधूक वाढली; वंचितचा ‘या’ उमेदवाराला पाठिंबा

ट्रॅक्टर चालक वैभव दिनकर आहेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील तपास देवळा स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुपा उद्योगनगरी 5 वर्षांत वेगाने विस्तारणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सुपा-नगरसह जिल्ह्यातील उद्योग नगरींचा विकास आतापर्यंत पूर्ण क्षमेतेने होणे अपेक्षीत होते. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न वाढवावे लागतील. या भागात तंत्रज्ञान विकास आणि उद्योग...