राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
एल अँड टी फायनान्स कंपनीच्या ट्रॅक्टर कर्ज वितरण प्रकरणी मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 65 कर्जदार व 4 सेल्स एक्झीक्युटीव्ह अशा एकुण 69 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एल अँड टी फायनांन्सचे झोनल सेल्स मॅनेजर योगेश छगन सुर्यवंशी रा. पुणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, एल अँड टी फायनांन्स तर्फे वाहन खरेदी, घर खरेदी, व्यावसायासाठी तसेच इतर गोष्टींसाठी कर्ज पुरविले जाते. कर्ज वितरण करण्याकरीता तसेच चौकशीसाठी हाताखाली सेल्स एक्झीक्युटीव्ह नेमलेले असतात. सेल्स एक्झीक्युटीव्ह हे कर्जाची आवश्यकता असणार्या ग्राहकांच्या भेटी घेणे, त्यांच्या कडुन कर्जसाठी आवश्यक असणार्या कागदपत्रांची पुर्तता करुन घेऊन ते ग्राहक कर्ज देण्याचा लायक आहेत किंवा नाही याबाबत चौकशी करुन त्यांच्या घराचे फोटो घेणे, कर्ज मंजुर झाल्यानंतर त्यांना ट्रॅक्टर डिलर यांचेकडून ट्रॅक्टर वितरीत करणे तसेच कर्जदार यांना टॅक्टर वितरीत केल्यानंतर त्यांच्याकडून कर्जाचा पहिला हप्ता भरुन घेणे असे कामे असतात.
परंतु आमच्या सेल्स एक्झीक्युटीव्ह यांच्याकडून ऑगस्ट-2023 ते नोव्हेंबर-2024 रोजी दरम्यान सचिन राजेंद्र जाधव, रा. जातप, पढेगाव ता- श्रीरामपूर, आकाश किशोर ओव्हळ, रा.भानसहिवरा ता-नेवासा, दगडु रंगनाथ शिरताड रा. सावरगाव ता-पारनेर, अक्षय बन्सी तापकिरे रा.मालकूप ता-पारनेर, रंगनाथ कृष्णा भालके रा. वनकुटे ता-पारनेर, सुनिल बापु नळघे रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, सचिन राजेंद्र बर्डे रा. प्रसादनगर तालुका श्रीरामपूर, गणेश बापुसाहेब गोलवड रा. त्रिंबकपूर, ता-राहुरी, पवन अशोक संसारे रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, सुरज दत्तात्रय रा. वाळुंज रा-ढवळगाव ता-पारनेर, अविनाश सुभाष पिंपळे रा. प्रसादनगर ता-श्रीरामपुर, विठ्ठल नारायण जर्हाड रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, नितीन बापुसाहेब तांदळे रा. कोल्हार बु ता-राहाता, बाळु भाऊ पवार रा. गाजदीपुर ता-पारनेर, मुजप्फर मनसुर खान रा. तनपुरेवाडी ता-राहुरी, दीपक सोपान तांबे रा. चिंचपूर बु. ता-संगमनेर, नितीन जाणु भिंगारदिवे रा. प्रवरानगर ता-राहाता, नारायण एकनाथ साळवे रा. वनकट्टे ता-पारनेर, मिरा सारंगधर करंजकर रा. देसवंडी ता- राहुरी, अर्जुन मुकेश गांगुर्डे रा-धोत्रे बु ता-पारनेर, दिलीप गोरख लहुंदे, रा. ताहराबाद ता-राहुरी, राहुल देवराम जाधव रा.वनकुटे ता-पारनेर, सलमान सलिम पठाण रा. खाटीक गल्ली राहुरी ता-राहुरी, विशाल सुनिल बर्डे रा. कोल्हार बु ता-राहाता, सौरभ सुधाकर संसारे रा.देवळाली प्रवरा ता-राहुरी, बळीराम धवाजी मेढे रा. पळशी ता-पारनेर, रघु किसन कोरडे रा. मैंगळवाडी ता- श्रीगोंदा, ज्ञानदेव केवाजी गंडाळ रा. महारकाड पळशी ता-पारनेर, बापुसाहेब जगन्नाथ बर्डे रा.संकरापूर ता-राहुरी, संजय जालिंदर माळी रा.चिंचोली ता-राहुरी, राहुल दगडु येरमाळ रा. तिसगाव ता-राहाता, अजिंक्य जालिंदर जगताप रा.चिंचविहिरे ता-राहुरी, शशिकात रंभाजी माळी रा-कर्जुले हर्या ता-पारनेर, योगेश दत्तात्रय वाघ रा.कजुर्ज हर्या ता-पारनेर, रवींद्र भगवान तमनर रा.गोटुंबे आखारा ता-राहुरी, संदीप पोपट कदम रा. मानोरी ता-राहुरी, अशोक बाळु अमोलिक रा.भोकर ता-श्रीरामपुर, सतीष पांडुरंग पठारे- टाकळीभान, ता-श्रीरामपूर, आप्पा रामदास सोनवणे, रा.मनिषा मेडीकल जवळ, वार्ड नंबर-7 श्रीरामपुर, बाळासाहेब प्रभाकर राठोड रा. लोहगाव ता-राहाता, सतिष उत्तम वाघ रा. माहेगाव ता-श्रीरामपुर, कैलास विश्वनाथ शिंदे रा.दहिगाव ता-अहमदनगर, रुषीकेश कैलास जोशी रा. दत्तनगर ता-श्रीरामपूर, विलास विठ्ठल कदम रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, अर्जुन सोमनाथ मोरे रा.जातप ता-राहुरी, कृष्णकांत उत्तम कदम रा.देवळाली प्रवरा ता-राहुरी, मीनीनाथ बाळासाहेब काळे रा.देवळाली प्रवरा ता-राहुरी, पांडुरंग बाळासाहेब शिंदे रा. जातप ता-राहुरी, शेखर सुभाष जमधडे रा. बेलापूर बु. ता-श्रीरामपूर, रवींद्र सिताराम माळी रा. संक्रापूर ता-राहुरी, गोरख साहेबराव शिरसाट रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, आप्पासाहेब दिगंबर पंडीत रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, गणेश अशोक तुपे रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, अविनाश सुखदेव शेंडगे रा. देवळाली प्रवरा ता-राहुरी, बुधा गंगाराम मेंगाळ रा.पळशी ता-पारनेर, सुभाष बाळू पवार रा. पोखरी ता-पारनेर, बाळू सांडू पवार रा-ढोकी ता-पारनेर, राहुल अशोक भिंगारदिवे रा. करंदी ता-पारनेर, पांडुरंग छबाजी साठे रा. पाडळी कान्हुर ता-पारनेर, धनंजय कांतीलाल गांगुर्डे रा. पाडळी कान्हुर ता-पारनेर, गिरीधर मारुती सोलट रा. हिवरे झरे ता-अहिल्यानगर, दिलीप आनंदा कोतकर रा.राळेगण ता- पारनेर, तुळशीराम लक्ष्मण बर्डे रा.राळेगण ता-पारनेर, किरण भिवा मांढे रा.चिंभळे ता-श्रीगोंदा, संभाजी एकनाथ परे रा.कोल्हार बु. ता-राहाता, या कर्जदारांनी ट्रॅक्टर खरेदी करीता कर्जाची मागणी केली होती.
या कर्जदारांची आमचे एल अँड टी फायनांन्समध्ये काम करणार्या सेल्स एक्झीक्युटीव्ह यांनी चौकशी करुन त्यांचे कागदपत्रे प्राप्त करुन घेऊन त्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी 4 कोटी 3 लाख 40 हजार 475 रुपये रक्कम कर्ज म्हणून वितरीत करण्यात आले. त्यातून कर्जदार यांनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. कर्जदार यांनी टॅक्टर खरेदी केल्यानंतर त्यांनी मुदतीत कर्ज भरणे अपेक्षीत असताना त्यांनी ते मुदतीत भरले नाही. कर्जदार यांच्या खात्यावरुन कर्जाचा हप्ता हा बँकेच्या खात्यातून न आल्यामुळे आमचे फायनांन्स कंपनीचे अधिकृत लोक हे कर्जदार यांच्या घरी जावुन चौकशी केली असता कर्जदार यांनी आमच्या लोकांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन कर्ज हप्ते भरण्यास नकार दिला.
अशाच प्रकारे आमचे बर्याच कर्जदार यांनी कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे किंवा त्यांच्या खात्यातून कर्ज हप्ता कट न झाल्याने आमच्या कंपनीचे एरीया मॅनेजर आनंद एकनाथ पैठणे यांनी त्याबाबत चौकशी केली असता त्यांच्या चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की, वरील कर्जदारांनी त्यांना टॅक्टर खरेदी करण्यासाठी आमचे सेल्स एक्झीक्युटीव्ह हर्षल गोकुळ सालबांडे रा. सालबांडे वस्ती, बेलापूर ता- श्रीरामपुर, खंडेराव सिमाजी रक्ताटे रा. लोणी ता. आष्टी जि-बीड, अक्षय, चंद्रकांत कराळे रा. कामत शिंगवे ता. पाथर्डी, राहुल गणपत कांडेकर रा. हमीदपुर, हिंगणगाव ता-अहमदनगर यांच्याशी संगनमत करुन कर्जा करीता ते ज्या ठिकाणी राहण्यास नाहीत अशा घरासमोर उभे राहुन फोटो काढुन, राहण्याचे पत्ते खोटे सांगुन 4 कोटी 3 लाख 40 हजार 475 रुपये कर्ज घेऊन त्याची व्याजासह रक्कम 4 कोटी 82 लाख 77 हजार 625 रुपये एवढी न भरता एल अँड टी फायनान्स कंपनीची फसवणूक केली आहे.
झोनल सेल्स मॅनेजर योगेश छगन सुर्यवंशी रा. पुणे यांच्या फिर्यादीवरून 1 ते 65 कर्जदार तसेच सेल्स एक्झीक्युटीव्ह हर्षल गोकुळ सालबांडे रा. सालबांडे वस्ती, बेलापूर ता- श्रीरामपुर, खंडेराव सिमाजी रक्ताटे रा. लोणी ता. आष्टी जि-बीड. अक्षय चंद्रकांत कराळे रा. कामत शिंगवे ता. पाथर्डी, राहुल गणपत कांडेकर रा. हमीदपुर, हिंगणगाव ता.नगर यांच्या गु.र.न. 1396/25 नुसार भारतीय न्याय संहिता 336(2), 335, 318(4), 316(5), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ करीत आहेत.




