Wednesday, September 11, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

नाशकात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकरी विरोधी कायद्याविरोधात ( Farmers Bill ) व प्रस्तावित वीजबिल ( electricity bill ) कायद्याविरोधात नाशिक येथे 29 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली ( Tractor Rally )आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

भाकप जिल्हा कॉन्सिल बैठक नुकतीच झाली. भाकप राज्य सहसचिव सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ राजू देसले उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवीदास भोपळे होते. येणार्‍या जि. प., मनपा, निवडणुकींबाबत निर्णय घेण्यात आले. पक्ष संघटनाबाबत जन संघटना आढावा घेण्यात आला.

शेतकरी विरोधी व प्रस्तावित वीजबिल कायद्याविरोधात 29 ऑगस्ट ट्रॅक्टर रॅली ( Tractor Rally ) नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. वाढती महागाई विरोधात, पेट्रोल, डिझेल दरवाढविरोधात 15 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

1 लाख सह्या जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे प्रास्तविक जिल्हा सचिव कॉम्रेड भास्कर शिंदे यांंनी केले. या प्रसंगी विराज देवांग, अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, नामदेव बोराडे, पद्माकर इंगळे, वित्तल घुले, किरण डावखर, एस खतीब, शिवाजी पगारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या