Thursday, July 23, 2026
HomeनगरAccident News : ट्रॉलीला रिक्षा धडकली; एक जण ठार

Accident News : ट्रॉलीला रिक्षा धडकली; एक जण ठार

7 जण जखमी || तिघांची प्रकृती गंभीर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

नगर-मनमाड रस्त्यावरील (Nagar Manmad Highway) येसगाव हद्दीत उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने अपघातात (Tractor Trolley and Rickshaw Accident) एक ठार तर सात जण जखमी झाले. ही घटना शुक्रवार 18 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगर-मनमाड रस्त्यावरील येसगाव शिवारात हॉटेल संस्कृतीसमोर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. त्याचवेळी एमएच 17 बीझेड 0370 अपघातात वाल्मीक नाना घनघाव (वय 60, रा. पिंपळस, ता. निफाड) हे जागीच ठार झाले. तर सलिम रजाक सय्यद (रा. येसगाव), गौरी पाईक (रा. येसगाव), रेखा लोखंडे (खिर्डी गणेश) हे गंभीर जखमी झाले. सगुणाबाई पवार (येसगाव), सायली त्रिभुवन (रा. येसगाव), चालक अतुल बैरागी (येसगाव), निशा पाईक (रा. येसगाव) यांनाही जखम झाल्या आहेत. गंभीर जखमींवर नाशिक (Nashik) व लोणी (Loni) येथे तर उर्वरित जखमींवर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत वाल्मीक घनघाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वलवे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...