Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमनातेवाईकानेच दोघा व्यापार्‍याला घातला 21 लाखांना गंडा

नातेवाईकानेच दोघा व्यापार्‍याला घातला 21 लाखांना गंडा

गाळ्याची खरेदी न देता उकळले पैसे || कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मार्केट यार्ड येथील गाळ्याची खरेदी देतो असे सांगून दोघा व्यापार्‍याकडून त्यांच्या नातेवाईकाने 21 लाख रुपये घेतले. मात्र गाळ्याची खरेदी न देता सदरचा गाळा दुसर्‍याला विक्री केला व पैसे न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशांत दिलीप झिंजुर्डे, दत्तात्रय बाळासाहेब झिंजुर्डे (रा. चंदन इस्टेट, बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) अशी फसवणूक झालेल्या व्यापार्‍यांची नावे आहेत. प्रशांत झिंजुर्डे यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा नातेवाईक नीलेश चंद्रकांत खताळ (रा. खताळ गल्ली, हनुमान मंदिराच्या समोर, बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी झिंजुर्डे यांचे शहरातील नवीपेठेत कपड्याचे दुकान आहे. त्यांचा नातेवाईक नीलेश खताळ याचा मार्केट यार्डमधील मर्चन्ट बँकेच्या शेजारी, शॉपिंग सेंटर येथे बेसमेंटमध्ये गाळा होता. त्यात तो व्यवसाय करत होता. तो जानेवारी 2024 मध्ये फिर्यादी झिंजुर्डे यांच्याकडे आला व ‘मला धंद्यामध्ये आर्थिक अडचण आहे, मला माझा गाळा विकायचा आहे’ असे म्हणाला. झिंजुर्डे व त्यांचे चुलत भाऊ दत्तात्रय झिंजुर्डे यांना व्यवसायासाठी गाळ्याची गरज असल्याने त्यांनी सदरचा गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. खताळ व त्यांच्यात 30 लाख रुपयांत गाळ्याचा व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे झिंजुर्डे बंधूंनी खताळला तीन लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

तसेच फिर्यादी झिंजुर्डे यांनी तीन चेकव्दारे नऊ लाख रुपये व दत्तात्रय झिंजुर्डे यांनी तीन चेकव्दारे नऊ लाख रुपये असे एकूण 21 लाख रुपये खताळ याला दिले होते. यानंतर झिंजुर्डे बंधू खताळ याला फोन करून बाकी राहिलेले नऊ लाख रुपये घेऊन गाळा नावावर करून द्या अशी वारंवार विचारणा करत असताना 8 जुलै 2024 रोजी फिर्यादी झिंजुर्डे सदर गाळ्या समोरून जात असताना त्यांना तो गाळा मोकळा दिसला. त्यांनी गाळ्यातील व्यक्तीकडे चौकशी केली असता सदरचा गाळा मी खरेदी केला असल्याचे त्या व्यक्तीने फिर्यादी झिंजुर्डे यांना सांगितले.

फिर्यादी झिंजुर्डे यांनी जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. मार्केट यार्ड, अहिल्यानगर येथे चौकशी केली असता नीलेश खताळ याने सदरचा गाळा बालिकाश्रम रस्ता, सावेडी येथील एका व्यक्तीला 76 लाख रुपयांना विक्री केल्याची माहिती समजली. दरम्यान, झिंजुर्डे बंधूंनी खताळ याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने मध्यस्थी मार्फत 15 दिवसांत पैसे देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याने अद्यापपर्यंत पैसे न दिल्याने झिंजुर्डे यांनी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नीलेश खताळ विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...