Sunday, November 24, 2024
Homeधुळेवाहतूकीचे नियम मोडणार्‍यांना वाहतूक शाखेचा दणका

वाहतूकीचे नियम मोडणार्‍यांना वाहतूक शाखेचा दणका

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरात वाहतूकीचे नियम मोडणार्‍यांना वाहतुक शाखेने चांगलाच दणका दिला आहे. पाच महिन्यात तब्बल 38 हजार 507 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 45 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू होणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन धुळे शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस (police) निरीक्षक संगीता राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

धुळे शहरात नेमण्यात आलेल्या विविध ट्रॉफिक पॉईन्टवर शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वाहतुक नियमन कर्तव्य करत असतांना 1 जानेवारी ते 8 जून 2023 दरम्यान वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकुण 38 हजार 507 वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडुन रोख रक्कम, ए.टी.एम. व क्यु. आर. कोडमार्फत एकुण 45 लाख 50 हजार रुपये इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली.

अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक), मुंबई यांनी ज्या वाहन धारकांवर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड प्रलंबीत आहे, त्यांचेविरुध्द न्यायालयात खटले दाखल करण्याचे आदेश दिले असुन जे वाहन धारक आपल्या वाहनांवर प्रलंबीत असलेल्या दंडाची रक्कम भरणार नाहीत त्यांचेविरुध्द न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रीया शहर वाहतुक शाखेतर्फे सुरु करण्यात आली आहे. जिल्हयातील वाहन धारकांनी आपल्या वाहनांवर प्रलंबीत असलेली दंडाची रक्कम माहित करुन घेण्यासाठी ट्रॉफिक पॉईंट नेमलेले अंमलदारांकडुन किंवा शहर वाहतुक शाखा येथे येवुन वाहन क्रमांक सांगुन आपल्या वाहनांवर प्रलंबीत असलेल्या रक्कमेची माहिती करून घ्यावी व आपल्या वाहनांवर प्रलंबीत असलेल्या दंडाची रक्कम लवकरात लवकर भरुन पुढील न्यायालयीन प्रक्रीया टाळावी, असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस दल व शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या