Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसीबीएस ते मेहेर रस्त्यावरील वाहतूक दोन दिवस 'या' कालावधीत राहणार बंद

सीबीएस ते मेहेर रस्त्यावरील वाहतूक दोन दिवस ‘या’ कालावधीत राहणार बंद

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार उद्या व परवा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दोन्ही रस्त्यांवर वाहतूक बंद केली जाणार आहे. यासह पर्यायी मार्गांनी वाहने नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमभंग करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गांत बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. उद्या 28 ऑक्टोबर २०२४ व मंगळवारी दि. 29 ऑक्टोबर २०२४ रोजी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली कॅम्प मतदारसंघातील उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमून वाहनांना पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी प्राधिकृत केलेल्या वाहनांसह पोलीस, अग्निशमन दलाच्या वाहनांसह रुग्णवाहिका व शववाहिकांना मार्ग खुले असतील. इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते यांनाही मार्ग बदलांचे नियम पाळावे लागतील.

ठळक मुद्दे
मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नल दोन्ही बाजूने होणारी वाहतूक सकाळी 10 वाजेपासून सायंकाळपर्यंत वाहतूक बंद.
त्र्यंबक नाका-टपाल कार्यालय-खडकाळी-शालिमार-सांगली बॅँक सिग्नलमार्गे इतरत्र वाहतूक.
अशोक स्तंभ-गंगापूररोड-पंडित कॉलनी-जुना गंगापूर नाकामार्गे इतरत्र.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या