Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : दोन दिवसांपासून सावळघाटातील वाहतुकीचा खोळंबा

Video : दोन दिवसांपासून सावळघाटातील वाहतुकीचा खोळंबा

कोहोर । वार्ताहर । Kohar

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) सावळघाट (Sawalghat) गावानजीक असलेल्या सावळघाटात मुख्य वळणावर ट्रक उलटल्याने (Truck Overturned) शनिवार (दि.२६) पासून वाहतूक खोळंबली असून आज रविवार (दि.२७) रोजी सदर परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

नाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

नाशिक-पेठपासून (Nashik-Peth) पुढे गुजरातला (Gujarat) जाण्यासाठी सावळघाटातील रस्ता महत्वाचा असून दिवसेंदिवस या एकेरी रस्त्यावरील वळणांवर वाहने उलटत असल्याने प्रवाशी व वाहनधारकांना (Passengers and Drivers) विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच वेळेत प्रवास करून देखील नागरिकांचे वेळापत्रक बिघडल्याचे चित्र दिसत आहे.

Nashik News : बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

पेठ तालुक्यातील सीमावर्ती भागात सावळघाट व मध्य भागात कोटंबीघाट (Kotambi Ghat) येत असून या घाटातील रस्त्यांच्या कमी रूंदीकरणामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी बाजू देणे कामी जागा कमी पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर अधिक लांबीचे कंटेनर जागे अभावी उलटत असल्याच्या घटना घडत असून प्रवाशांसह वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Uddhav Thackeray : “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं

हायवेवर सुविधांचा अभाव

चाचड गावानजिक टोलनाका (Toll Booth) असून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून दिवसेंदिवस टोल वसूली केली जात आहे. परंतु, या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची टोलनाका विभागांकडून सुविधा दिली जात नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Eknath Shinde : “…अन् एका झटक्यात ऑनलाइनवाले लाईनवर आणले”; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

- Advertisment -

ताज्या बातम्या