नाशिक | Nashik
शनिवर सकाळ पासून जोरदार पाऊस झाल्याने अनेक नागरीकांना याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय. आगोदरच खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे वाहनचालकांवर वाहने संथगतीने चालविण्याची वेळ आली. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून शहरातील वाहतुक विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर साठलेले पाणी यामुळे वाहतुक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली आहे.
शहरात शनिवार सकाळपावसाची रिप-रिप सुरु आहे. त्यातच, आज शनिवार सुट्टीचा वार असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची गर्दी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
G20 आता G21 म्हणून ओळखली जाणार?
त्यातच पावसामुळे रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहतुक मंदावल्याने शहरातील मुख्य रस्ते असलेले एमजी रोड, सीबीएस, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, गोविंद नगर, सारडा सर्कल, सिटी सेंटर मॉल परीसर, इंदिरानगर, पार्थर्डी फाटा, राणेनगर, द्वारका चौक, नाशिक-पुणे महामार्गासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाल्याने दुचाकी चारचाकी चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.