नाशिक-मुंबई महामार्गावरून जाताय? आधी ही बातमी वाचा

jalgaon-digital
1 Min Read

इगतपुरी | Igatpuri

येथील नाशिक-मुंबई महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) पिंपरी फाटा येथे कंटेनर बंद पडल्याने पिंपरी फाटा ते तळेगाव फाटा दरम्यान वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे…

पावसाळा, उन्हाळा की हिवाळा? नाशिककर संभ्रमात

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या (Vehicles) दीड किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच वाहनचालक पुढे लवकर जायच्या नादात कुठल्याही दिशेने वाहने चालवत असल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

दरम्यान, दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे सर्व्हिस रोडवरून अवजड वाहने (Heavy Vehicles) नेल्याने सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून घोटी येथील महामार्ग पोलिस केंद्राचे कर्मचारी गेल्या दीड तासांपासून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *