Saturday, July 27, 2024
Homeनाशिकरस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी

रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराचे प्रवेशद्वार म्हणून जगात प्रसिध्द द्वारका चौक( Dwarkar Chowk ) व मध्यवर्ती चौक असलेल्या शालिमार चौकाला ( Shalimar chowk )हातगाडीवाले व रस्त्यांवर विक्रीसाठी बसणार्‍या लहान व्यापार्‍यांसह बेशिस्त वाहन पार्कींगमुळे रहदारीस मोठी अडचण निर्माण होत आहे. मनपा प्रशासन (NMC Administration) या गंभीर समस्येकडे विशेष लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस प्रश्न जटील होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

- Advertisement -

द्वारका चौकातील वाढलेले अतिक्रमण व त्याच प्रमाणे थेट रस्त्यावर वाहने उभे करणार्‍यांमुळे या चौकाचा खरा नूर हरपला आहे. देशासह जगभरातून लाखो भाविक पवित्र गंगा, गोदावरीसाठी नाशिकला याच मार्गाने नाशिकमध्ये दाखल होतात, मात्र वाहतूक कोंडीने त्यांचे स्वागत होते. हे दुर्दैवच. या ठिकाण कोट्यवधी रुपये खर्चून भुयारी मार्ग तयार करण्यात आला, मात्र त्याचा पाहिजे तसा उपयोग अद्याप झालेला नाही. तर या ठिकाणाहून दुचाकी जाण्यासाठी सोय झाल्यास कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. अनेक बैठका होऊनही द्वारकावरील प्रश्न सुटलेला नाही.

शालिमार : शहरातील मध्यवर्ती मोठा चौक म्हणून प्रसिध्द शालिमार चौकातील फेरीवाले, हातगाडीवाले व रस्त्यावर बसणार्‍या अतिक्रमणधारकांमुळे चौक कुठे आहे व मार्ग कुठे हेच कळत नाही. या ठिकाणी विभागीय संदर्भ रुग्णालय असून राज्यभरातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो.

कारंजाची दुरवस्था : शालिमार चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. या ठिकाणी अत्यंत सुंदर असा कारंजा तयार करण्यात आला होता. मात्र मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण परिसराला अतिक्रमणाने वेढा घातलेला आहे. अनेक वेळा या ठिकाणी वाद झाले आहेत. यामुळे सामान्य नागरिक या भागात येतांना दहशतीत असतात. मुख्य चौकात पोलीस चौकी तयार करण्यात आलेली असली तरी त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या