धुळे । Dhule । प्रतिनिधी
साक्री-पिंपळनेर रस्त्यावर भाडणे फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Squad) पथकाने सापळा रचून देशी दारूची (Country liquor) चोरटी वाहतूक रोखली. कारसह पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हॉटेल व्यावसायीकासह दोघांना अटक (Both were arrested) करण्यात आली आहे.
साक्री-पिंपळनेर रस्त्यावरुन साक्रीतील एक जण साथीदारासह एम.एच. 01 सी.जे. 0556 क्रमांकाच्या वाहनाने देशी-विदेशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानंतर पथकाने साक्रीतील साक्री-पिंपळनेर रोडवरील भाडणे फाटा येथे सापळा रचला.
VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपितVisual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’
आज पहाटे 2.45 वाजेच्या सुमारास संशयित वाहन पिंपळनेरकडून येतांना दिसताच वाहनास थांबविले. वाहनात बसलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता वाहन चालकाने त्याचे नाव श्रीराम मोतीराम बाबर (वय 30 रा. सुभाष चौक, आदर्श शाळेसमोर, साक्री) असे सांगून हॉटेल व्यवसाय करत असल्याचे सांगितले.
तर त्यांचा साथीदाराने विकास ऊर्फ कालु चरणदास गौड (वय 24 रा. सुभाष चौक, बाजारपेठ, साक्री) असे त्याचे नाव सांगितले. त्यांच्या ताब्यातील इंडिगो वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारु मिळून आली. दोन लाखांची कार व 67 हजारांची टँगो पंच देशी दारुच्या बाटल्यांचे 19 बॉक्स असा एकूण दोन लाख 67 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Visual Story : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा गुलाबी लुक पाहाल तर तुम्ही व्हाल आशिक… VISUAL STORY : खान्देश कन्येची अधुरी कहानी लेकाचे आयुष्य झाले सुने सुने
साक्री पोलीस ठाण्यात पोना राहुल सानप यांनी फिर्यादी दिली. त्यावरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय हेमंत पाटील, पीएसआय योगेश राऊत, एएसआय संजय पाटील, पोहेकॉ रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, पोना राहुल सानप, तुषार पारधी, मयुर पाटील, राजू गिते यांच्या पथकाने केली आहे.
सावद्यात ५५ ग्राहकांचे वीजमीटर जप्तन्युर्याक फॅशन वीक मध्ये सादर होणार स्वदेशी खादी कापडाच्या डिझाईन्सचे गारमेन्टस