धुळे – प्रतिनिधी dhule
मध्यप्रदेशातुन (mp) हंस ट्रॅव्हल्स (Travels) मधून होणारी गुटख्याची वाहतूक एलसीबीच्या (lcb) पथकाने रोखली. पहाटे मुंबई-आग्रा (Mumbai-Agra) मार्गावरील अवधान टोल नाक्यावर सापळा रचत दोन ट्रॅव्हल्सला पकडण्यात आले. त्यात १६ लाखांचा गुटखा, पानमसाला मिळून आला.
गुटक्यासह दोन्ही ट्रॅव्हल्स असा ऐकुण ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्यात प्रतिबंधीत गुटख्याची हंस ट्रॅव्हल्सद्वारे धुळे मार्गे वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना कळवित आज पहाटे पथकासह अवधान टोल नाक्याजवळ सापळा लावला.
पाच वाजता एकापाठोपाठ आलेल्या एन. एल. ०७ बी. ५४१ व एन. एल. ०७ बी. ०५४५ क्रमांकांच्या दोन लक्झरी बसला अडविण्यात आले. पथकाने दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत सुगंधित पान मसाला व गुटखा मिळून आला.५ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा प्रिमियम राजनिवास पानमसाला, १ लाख ४४ हजारांचा जाफरानी जर्दा, २ लाखांचा राजश्री पानमसाला, १ लाख ८७ हजारांचा आरएमडी पानमसाला, ८६ हजारांची तंबाखू, ४ लाख ५ हजाराची
स्विट सुपारी, ६ हजार किंमतीच्या गोळ्या, २० हजारांचे ४ मोबाईल व ६० लाख रुपये किंमतीच्या दोन ट्रॅव्हल्स असा एकूण एकूण ७६ लाख २८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच ट्रॅव्हल्सचा चालक महोम्मद रईस गुलजारअहमद (वय ३६ उज्जैन, म.प्र), सहचालक शेख रमजान शेख शुबराती (वय ४५ रा. खंडवा), क्लिनर रघुराज दुर्गा मिना (वय २९ कन्नोज, जि. देवास, म. प्र.), चालक मोहम्मद अशरफी अब्दुल अजीज (वय ३४ रा. इंदौर), सहचालक शेख राजेश गणेश बिसोदीया (वय ४५ रा. पालदा, इंदौर), क्लिनर हरीशंकर
जल्लू यादव (वय २२, रा. बिरसिंगपूर, जिल्हा सतना, मध्य प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक सतिष गोराडे, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, एएसआय संजय पाटील, पोहेकॉ.
संदीप सरग, पोना. पंकज खैरमोडे, पोकॉ. सुनील पाटील यांनी केली.