Saturday, May 4, 2024
Homeनाशिकहेल्मेट समुपदेशन आणि परीक्षेसाठी वाहतूक पोलिसांचे आर्जवे

हेल्मेट समुपदेशन आणि परीक्षेसाठी वाहतूक पोलिसांचे आर्जवे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात नागरिकांनी हेल्मेट वापरावे ( Uses of Helmet ) यासाठी समुपदेशन आणि परीक्षा (helmet counseling & exam ) घेण्यात येत आहे. मात्र यामध्ये खाकीचा धाक कमी झाल्याचे चित्र आहे. पोलीस हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना परीक्षा देण्यासाठी विनंती करत असल्याचे चित्र समोर आले आहे.

- Advertisement -

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेट वापराबाबत जनजागृती आणि समुपदेशनसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, 15 दिवसांनंतर पोलीस हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना परीक्षा देण्यासाठी आर्जवे करत असल्याचे समोर आले आहे.

साहेब, एक छोटी परीक्षा.. सर, फक्त 10 मिनिटांत परीक्षा आटोपेल..प्लिज थांबा अशा भाषेत आर्जवे करताना दिसत आहे. दिवसभरात ठराविक आकड्यापर्यंत परीक्षा घ्यायचीच असेही टार्गेट दिले जात असल्याचे समजते आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांनी शहराच्या हद्दीत नागरिकांनी हेल्मेट वापरावे यासाठी विविध योजना आखल्या आहेत. यात नो हेल्मेट नो पेट्रोल, विना हेल्मेट धारकांचे समुपदेशन, नो हेल्मेट नो को ऑपरेशन आणि त्यानंतर आता परीक्षा असे सत्र राबवत आहेत.

पोलीस आयुक्तांच्या या धोरणामुळे शहरातील शिस्तीचे चित्र जरी बदलत असले तरी गुन्हेगारीचा आलेख रोजच वाढत आहे. आता वाहतूक पोलिसांच्या या टार्गेट धोरणामुळे देखील काय चित्र पुढे येते हे बघणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या