Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : वलखेडला बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू

दुर्दैवी : वलखेडला बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

वलखेड येथे दोन वर्षीय मुलीवर बिबट्याने आज रात्री ८.०० वाजेच्या सुमारास हल्ला केला होता, हल्ल्यानंतर बिबट्याने लहान मुलीला उचलून नेले होते.
या घटनेनंतर लगेचच शोधकार्या नंतर लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे.

वलखेड येथील नारायण जयवंत शिंदे यांच्या मळ्यातील कामगारांची मुलगी ज्ञानेश्वरी मोरे वय वर्षे २ हिला बिबट्याने हल्ला करत ओढून नेले होते.दरम्यान लगेचच वन विभाग वपोलीस यंत्रणा व स्थानिक नागरिकांद्वारे शोधकार्य सुरू झाले. दरम्यान काही वेळेनंतर ज्ञानेश्वरीचा मृतदेह वलखेड येथील रामभाऊ बोंबले यांच्या पेरूच्या बागेत मिळून आला आहे.

ज्ञानेश्वरी मोरे हिचा मृतदेह दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Kolkata Tragedy : कोलकाता दुर्गापूजा मंडप दुर्घटनेतील मृतांचा आकडा १९ वर;...

0
कोलकाता | Kolkata पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोलकाता (Kolkata) येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात (Durga Puja Mandp) शनिवारी (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९...