Thursday, April 3, 2025
Homeमनोरंजनप्रियंकाचा आगामी हॉलीवूडपट ‘वुई कॅन बी हिरोज’चा ट्रेलर रिलीज

प्रियंकाचा आगामी हॉलीवूडपट ‘वुई कॅन बी हिरोज’चा ट्रेलर रिलीज

नवी दिल्ली – New Delhi

सध्या हॉलिवूडमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. नुकताच तिचा आगामी हॉलिवूडपट ‘वुई कॅन बी हिरोज’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रियंकाचा दमदार अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रियंकाचा वेगळा आणि नवा अंदाज पाहायला मिळत आहे.

प्रियंकाने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आणला आहे. हा एक सुपर नॅचरल चित्रपट असून यात ख्रिस्टियन स्लॅटर, सुंग कंग, पेड्रो पास्कल, बॉय्ड होलब्रुक आणि हॅली रेईनहर्ट यांच्यासह प्रियंका चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.

प्रियंकाने चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना लिहिले की, शक्ती सर्व आकारात येते आणि ख्रिसमसच्या दिवशी ती येणार आहे. या अमॅझिंग मुलांकडे गुप्त शस्त्र आहे, टीमवर्क. सेटवर यामुळे वेगळीच ऊर्जा होती आणि या चित्रपटाचे ते अस्तित्व आहे.

दरम्यान, तुम्ही सांताची वाट पाहत असताना बघा हिरो कसा असावा, या मुलांना हे तुम्हाला दाखवू द्या. मग तुम्ही येत आहात ना?ङ्ग

या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी केले असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘द एडवेंचर्स ऑॅफ शार्कबॉय एंड लावागर्ल’ हा चित्रपट सीक्वल आहे.

प्रियंका बेवॉच मधील निगेटीव्ह भूमिकेनंतर या चित्रपटातही नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून तो सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : नशेच्या गोळ्या व इंजेक्शन्सची विक्री करणारा तरुण गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur नशेच्या गोळया व इंजेक्शन्सची विक्री करणार्‍या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलीसांनी अटक केली.त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या व इंजेक्शनच्या औषधी बाटल्या तसेच 16 मोबाईल जप्त...