मुंबई I mumbai
विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विद्याने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे…
चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे.
आपली नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
हा चित्रपट १८ जून रोजी ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्यासोबत अभिनेता शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत. निर्मिती टी सिरीजचे भूषण कुमार यांनी केली आहे.