Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशरेल्वेचा भीषण अपघात; १० डब्बे रुळावरुन घसरले, १५ जणांचा मृत्यू

रेल्वेचा भीषण अपघात; १० डब्बे रुळावरुन घसरले, १५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे (Pakistan Railway Accident) अपघात झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे (Hajara Express Derailed) दहा डबे रुळावरून घसरले असून या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू (15 Death) झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जवळपास ८० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. हे स्टेशन शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नवाबशाहमधील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हजारा एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला. ही ट्रेन कराचीहून रावळपिंडीला जात होती. सरहरी रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनचे १० डबे रुळावरुन खाली घसरले.

Viral Video: प्रेयसीचा ड्रामा, रागाच्याभरात चढली थेट १५० फुट टॉवरवर; पुढे घडलं असं काही..

अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या नवाबशहा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून अधिकारी तपास करत आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी पाकिस्तान रेल्वेचे विभागीय अधीक्षक सुक्कूर मोहम्मदुर रहमान यांच्या हवाल्याने सांगितले आहे की १० बोगी रुळावरून घसरल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.

“अजितदादा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागी आलात, पण..”; अमित शहाचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य

या घटनेनंतर लाहोरमध्ये माध्यमांशी बोलताना रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक म्हणाले की, “अधिकाऱ्यांना या घटनेबाबत सतर्क करण्यात आले आहे. अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या