Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या बदलीची शक्यता

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या बदलीची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे अनेक तक्रारी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S. Chokkalingam) यांची बदली (Transfer) केली जाण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भारत निवडणूक आयोगाकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती मंत्रालय सूत्रांनी मंगळवारी दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ‘त्या’ आमदारांना काँग्रेस देणार झटका

राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) अनेक अडचणींचा सामना करावा लागला. निवडणूक आणि मतदानाशी संबंधित प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून योग्यवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने तयार केलेल्या प्रचार गीतावर तक्रार होऊनही आयोगाकडून कारवाई झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका होत असल्याच्या काँग्रेसच्या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Election Officer) कार्यालयातून नोटीस बजावण्यात आल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक मतदारसंघात ढिसाळपणा दिसून आला.

हे देखील वाचा : Paris Olympic 2024 : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कमाल; पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीत धडक

तसेच निवडणुकीशी संबंधित बाबींवर खर्च करताना बंधने घालण्यात आल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. मतदान (Voting) नोंदणी होऊनही अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी चोक्कलिंगम यांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची जुलै २०१९ मध्ये बदली करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीला जेमतेम तीन महिने बाकी असताना बलदेव सिंग यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आताही तसा निर्णय होऊ शकतो.

हे देखील वाचा : Nashik News : विधानसभेसाठी मतदारांमध्ये १ लाख ३० हजारांनी वाढ; निवडणुक तयारीला वेग

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली करायचे झाल्यास भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यात चर्चा होते. त्यानंतर राज्य सरकारडून आयोगाला तीन नावांची शिफारस केली जाते. या तीन नावांपैकी एका नावावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब केले जाते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नितीन गद्रे यांची स्वेच्छानिवृत्ती आणि सुमंत भांगे यांची सेवानिवृत्ती यामुळे सध्या सामान्य प्रशासन (सेवा) आणि सामाजिक न्याय विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या दोनपैकी एका विभागात एस. चोक्कलिंगम यांची वर्णी लागू शकते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या