नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक पाेलिस आयुक्तालयातील अकरा वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील सात पाेलिस निरीक्षकांना ठाणे शहरात नियुक्त करण्यात आले आहे.
- Advertisement -
यामुळे आयुक्तालयातील विविध कार्यकारी व अकार्यकारी पदे रिक्त झाली असून छत्रपती संभाजीनगर येथून आम्रपाली तायडे व गणेश ताठे, अशाेक गिरी व सुशील जुमडे यांची नाशिक आयुक्तालयात बदली झाली आहे.
तर नाशकातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांत अनिल चंद्रकांत शिंदे, राजु भिकाजी पाचोरकर, विजय विष्णु पगारे, तुषार मुरलीधर अढावु, नितीन दौलतराव पगार, पवन जयराम चौधरी, बाबासाहेब भास्कर दुकळे, गणेश मधुकर न्हायदे, श्रीकांत शामराव निंबाळकर, पंकज प्रल्हाद भालेराव, प्रमोद सदाशिव वाघ यांचा समावेश आहे.