Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्यापाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी


मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्य सरकारने (State Government) आज सोमवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfer of five Chartered Officers) आदेश जारी केले. त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (Pune Metropolitan Transport Corporation) अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

- Advertisement -

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

तर पुणे स्मार्ट सिटीचे (Pune Smart City) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. कोलते यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तर २०१० च्या तुकडीचे अधिकारी कैलाश पगारे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (Maharashtra State Cooperative Cotton Growers Marketing Federation) व्यस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.

नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर आता ‘या’ जिल्ह्यात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

याशिवाय महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांची मुंबईत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या शिधा नियंत्रकपदी तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अजित पवार यांची मुंबईत दुग्धविकास आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईतील कांदिवलीत इमारतीला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या