Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याPM Kisan Sanman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला १५ वा...

PM Kisan Sanman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला १५ वा हफ्ता जमा होणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Sanman Nidhi Yojana)अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. त्यातच आता पिएम सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेच्या १५ व्या हप्त्याचे हस्तांतरण (15th Installment) १५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. देशातील ८ कोटी शेतकऱ्यांना १५ वा हप्ता DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी ६,००० रुपये दिले जातात.

सध्या १४ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकरी १५ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे.

PM किसानचे १५ व्या हप्त्याचे २,००० रुपये ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत त्यांनाच १५ वा हप्ता दिला जाईल. अशा परिस्थितीत शेतकरी लाभार्थी यादीत नाव तपासू शकतात.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय, शेतकरी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी तुम्हाला प्रथम www.pmkisan.gov.in वर जावे लागेल. यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका. आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचे e-KYC केले जाईल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या