Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची बदली

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची बदली

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादात अखेर देशमुख यांची बदली करण्यात आली. देशमुख यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

विजयसिंह देशमुख यांनी महामंडळाचा कारभार संथ गतीने सुरू ठेवल्याचा तसेच महामंडळाचे पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. महामंडळाच्या माध्यमातून कर्ज आणि इतर योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजातील तरुण उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची पाटील यांची तक्रार होती. काही मंजूर प्रकरणांमध्ये एलओआय अचानक रद्द करण्यात आल्याने लाभार्थी आणि उद्योजकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

पाच जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर अहवाल
नरेंद्र पाटील यांनी नुकताच पाच जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात मराठा समाजातील तरुण उद्योजक आणि महामंडळाच्या लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणे तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत अहवालात माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर विजयसिंह देशमुख यांची व्यवस्थापकीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून अविनाश रणखांब यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील आणि देशमुख यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...