Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिक विभागातील २१ तहसीलदारांची खांदेपालट

नाशिक विभागातील २१ तहसीलदारांची खांदेपालट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महसूल विभागातील तहसीलदारांच्याही (Tehsildar) बदल्या झाल्या असून आहे. विभागातील २१ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे, महसूल चिटणीस राजेंद्र नजन, कुळ कायदा विभागाच्या तहसीलदार पल्लवी जगताप यांची बदली झाली असून, ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या जागी बदलून आलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र आपापला पदभार स्वीकारला आहे…  

- Advertisement -

राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यापाठोपाठ तहसीलदारांच्या बदल्यांचेही आदेश काढले.यामध्ये नाशिकचे तहसीलदार दौंडे यांच्या जागी नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची नियुक्ती झाली आहे. बहिरम यांच्या जागी राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांची बदली झाली आहे.

Video : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी पिकअपला सिनेस्टाईल पकडलं अन् समोर आला ‘हा’ धक्कादायक प्रकार…

पेठ तहसीलदार पदी विभागीय आयुक्तालयातील अनिल पुरे तसेच शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांना येवल्यात नेमणूक मिळाली आहे. पेठ तहसीलदार संदीपकुमार भोसले व येवला तहसीलदार प्रमोद हिले नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील यूएलसी विभागात बदली करण्यात आली.

महसूल चिटणीस नजन यांच्या जागेवर कासुळे यांची निवड केली आहे.त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांची शहादा तहसीलदारपदी बदली करण्यात आली असून, शहाद्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांची नाशिकरोड येथील महसूल प्रबोधिनीत बदली झाली.

प्रबोधिनीच्या तहसीलदार मंजूषा घाटगे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नेमणूक मिळाली आहे. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे नियुक्ती देण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड यांची जिल्हाधिकारी कार्यालयात कुळकायदा विभागात नियुक्ती झाली आहे. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांची राहुरी तहसीलदारपदी बदली झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या