Monday, July 22, 2024
Homeनगरगटशिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्या

गटशिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्या

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

- Advertisement -

राज्य शासनाने धोरणामुळे लांबलेल्या बदल्यांना अखेर सुरुवात केली असून शिक्षण विभागातील (Department of Education) वर्ग दोनच्या पंधरा उपशिक्षणाधिकारी (Deputy Education Officer) समकक्ष पदांच्या बदल्या केल्या आहेत. त्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे.

संगमनेर येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या साईलता सामलेटी यांची श्रीरामपूर (Shrirampur) पंचायत समितीतील रिक्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे तर पाथर्डी येथील गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांची पंचायत समिती शेवगाव येथील रिक्त असलेल्या पदावर बदली करण्यात आली आहे. राज्यातील 15 गटशिक्षणाधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मुंबई उपनगरातील निरीक्षक मुस्ताक शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. अशोक कडूस यांची बदली सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर करण्यात आली आहे. राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत वर्ग 1 च्या अकरा शिक्षणाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या