Friday, May 3, 2024
Homeनाशिकमंदिर कायापालट कौतुकास्पद : वाजे

मंदिर कायापालट कौतुकास्पद : वाजे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

गावातील दत्त मंदिराचा झालेला विकास (Development) कौतुकास्पद आहे. भाविकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून हे काम ग्रामस्थांसह सर्वांच्या स्मरणात राहणारे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांनी केले.

- Advertisement -

मर्‍हळ येथील श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण (beautification), सभामंडप व संरक्षक भिंत (protective wall) विकास कामांच्या लोकार्पण (Inauguration of development works) सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडुशेठ केदार (Pandusheth Kedar, President of Sri Brahmananda Swami Shikshan Prasarak Mandal) होते.

व्यासपिठावर उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी सदस्य निलेश केदार, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र पगार, गणेश वेलजाळी, नंदकिशोर मालपाणी, राकेश आव्हाड, नंदकिशोर मालपाणी, महंत दामोदर पाथरे, कृष्णराज महाराज, चाडेकर महाराज, मुख्याध्यापक रानडे उपस्थित होते.

विकासकामे करुन मिळालेल्या संधीचं सोन करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनीच केला. लोकांच्या गरजेच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी चांगली सुरुवात केली. घरची कामे समजून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. देवस्थान विकासासाठी एकजुटीने झालेले कार्य कौतुकास्पद आहे. हे काम भाविक, नागरिकांच्या नक्कीच लक्षात राहील असे वाजे यांनी सांगितले.

जागरुक देवस्थानाचा झालेला विकास यामुळे मर्‍हळच्या वैभवात भर पडली सांगळे म्हणाले. राजाभाऊ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांच्या कार्यकाळात अडीच वर्षानंतरही विविध गावात अजूनही अनेक विकासकामे सुरु आहेत. कामे करताना मतांची गोळाबेरीज न करता सामाजिक हिताला महत्त्व दिल्याचे सांगळे यांनी सांगितले. मंदिराचा जिर्णोद्धार व सुशोभीकरण कामामुळे आजच्या कृष्णाष्टमीच्या दिवशी लोकार्पण करताना दुग्धशर्करा योग साधून आल्याचे सांगळे म्हणाले.

कर्तृत्ववान पिढी घडण्यासाठी धार्मिक, सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे केदार म्हणाले. देवस्थानच्या विकासामुळे तरुण पिढीसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. नवनाथ आढाव यांनी सूत्रसंचलन केले. संजय कुर्‍हे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विलास आढाव, गोविंद आढाव, छबुलाल आढाव, दत्तू आढाव, भाऊसाहेब आढाव, श्रावण आढाव, गोरख आढाव, सागर आढाव यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या