Sunday, January 18, 2026
Homeक्राईमचौकात ड्युटीला आला तर जिवंत ठेवणार नाही; वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण

चौकात ड्युटीला आला तर जिवंत ठेवणार नाही; वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात वरिष्ठांच्या आदेशाने वाहतूक नियमन करत असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदाराला एका होमगार्डने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा या चौकात तसेच या रस्त्याला ड्युटीला आला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी (20 सप्टेंबर) सायंकाळी होमगार्ड विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

विवेक संजय वैष्णव (वय 30) असे मारहाण झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी वैष्णव हे गेल्या वर्षभरापासून शहर वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. ते वरिष्ठांच्या आदेशाने शहर परिसरात विविध ठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करतात. 11 जुलै रोजी रात्री त्यांची नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात ड्युटी होती. ते त्यांचे सहकारी अंमलदार ढोरमारे यांच्या समवेत वाहतूक नियमन करत असताना रात्री नऊच्या सुमारास बाळू जाधव नावाचा होमगार्ड तेथे त्याच्या कार मधून आला व त्याने वैष्णव यांना अवजड वाहने बायपासने वळवू नको, शहरातून जावू दे अशी शिवीगाळ करत अंगावर धावून गेला.धक्काबुक्की केली व तेथून निघून गेला.

YouTube video player

त्यानंतर फिर्यादी वैष्णव हे 14 सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा शेंडी बायपास चौकात ड्युटीला गेलेले असताना बाळू जाधव पुन्हा तेथे आला व काय रे तुला सांगितलेले कळत नाही का? तू पुन्हा या चौकात ड्युटीला कसा आला असे म्हणून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी फिर्यादी वैष्णव यांचे सहकारी अंमलदार खराडे तेथे आले असता बाळू जाधव तेथून निघून गेला. त्या दिवशी रात्री 10 वाजता ड्युटी संपल्यावर फिर्यादी वैष्णव हे घरी जात असताना हॉटेल इंद्रायणी जवळ बाळू जाधव याने त्यांना रस्त्यात अडवले व शिवीगाळ करत मारहाण करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori शेतकर्‍यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दिंडोरी, पेठ,...