Friday, May 16, 2025
Homeधुळेपोंग्यांच्या आडून रजनीगंधा, तंबाखूची वाहतूक

पोंग्यांच्या आडून रजनीगंधा, तंबाखूची वाहतूक

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील दहिवद (Dahivad) गावाजवळ आयशर वाहनासह (Eicher vehicle) सुमारे 44 लाखांचा (44 lakhs in issue) रजनीगंधा, तंबाखू (rajnigandha, tobacco) मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने आज जप्त केला (LCB team seized) असून चालक व सहचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोंग्यांच्या आडून ही तस्करी केली जात होती.

शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळून रजनीगंधासह तंबाखूची तस्करी आयशर वाहनातून केली जात असल्याची माहिती एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने हॉटेल किसान जवळ सापळा रचला. त्यावेळी संशयित आयशर वाहन (एमएच 18/बीजी 7620) हे पळासनेरकडून शिरपूरच्या दिशेने येत असतांना त्या वाहनाला अडवून तपासणी केली. त्यावेळी वाहनात वरुन पोंगे आणि आतमध्ये गुटखा दडविलेला आढळून आला. त्यात 33 लाख 98 हजार 640 रुपयांची रजनीगंधा, भोलाछाप तंबाखू, तुलसी तंबाखू व मीराज तंबाखूचा समावेश होता. पथकाने 10 लाखांच्या आयशर वाहनासह वरील मुद्देमाल असा एकूण 43 लाख 98 हजार 640 रुपयांचा ऐवज जप्त केला. शाकीर जाकीर खान (24) व शादाब हैदर खान (25) रा. बामदा, ता.कसरावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश असे चालक व सहचालकाने त्यांचे नाव सांगितले. पथकाने या दोघांना ताब्यात घेतले असून अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळेमार्फत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय हेमंत पाटील, पोसई योगेश राऊत, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोहेकॉ संदीप सरग, अशोक पाटील, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...