Sunday, May 26, 2024
Homeनगरतरुण ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या

तरुण ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या

अकोले |प्रतिनिधी| Akole

एका 32 वर्षीय तरुणाने काल सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे घडली. अनिल भास्कर राक्षे(वय-32,रा उंचखडक खुर्द,ता.अकोले)असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा मयत तरुण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता.

- Advertisement -

घटना घडल्यानंतर मयताचा लहान भाऊ सुनील हा घटनास्थळी पोहचला.तेथून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय अकोले येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्या नंतर संबंधित युवकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी मयताचे चुलते हरिभाऊ निवृत्ती राक्षे यांनी अकोले पोलिसांना दिलेल्या खबरीनुसार अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद पवार हे करीत आहेत.

त्याचा पश्चात पत्नी,एक मुलगा,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर सायंकाळी उंचखडक खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयताच्या खिशात सुसाईड नोट लिहून आढळून आली. त्यात खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे.या सुसाईड नोटमध्ये संबंधित मयत तरूणाने खासगी सावकारकी करणार्‍या काही इसमांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या