Saturday, July 27, 2024
Homeनगरप्रवासादरम्यान पाच तोळ्याचे गंठण लांबविले

प्रवासादरम्यान पाच तोळ्याचे गंठण लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रिक्षा मधून प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व सात हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. 17) सायंकाळी माळीवाडा बस स्थानक ते नालेगाव अमरधाम दरम्यान घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 18) दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बेबी पांडुरंग पाटील (वय 52 रा. गायकवाड मळा, धनाजीनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या शनिवारी (दि. 16) त्यांच्या मुलीकडे पुणे येथे गेल्या होत्या. रविवारी सायंकाळी त्या पुणे येथून नगरमध्ये आल्या. माळीवाडा बस स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण, सात हजारांची रक्कम पर्स मध्ये ठेवली होती. तेथून त्या रिक्षामध्ये बसल्या व अमरधाम, नालेगाव येथे आल्यावर त्यांनी पर्स पाहिली असता त्यांना त्यातील गंठण व रोख रक्कम दिसली नाही. दरम्यान, त्यांना घेऊन आलेल्या रिक्षामध्ये दोन महिला होत्या तसेच फिर्यादी रिक्षातून खाली उतरल्यानंतर रिक्षा लगेच निघून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या