Monday, June 17, 2024
Homeदेश विदेशट्वीटरवर ट्रेंड होतंय #ArrestUddhavThackrey ; काय आहे कारण?

ट्वीटरवर ट्रेंड होतंय #ArrestUddhavThackrey ; काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

कालपासून राज्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचं वक्तव्य. त्यावरुन राज्यात झालेला दंगा, नारायण राणेंची अटक, सुनावणी, जामीन, सुटका हा सगळा नाट्यमय प्रकार महाराष्ट्राने अनुभवला. राज्याला शिवसेना आणि नारायण राणे (Shiv Sena vs Narayan Rane) संघर्ष नवा नसला तरी यावेळी मात्र वातावरण चांगलंच तापलं होतं.

अशातच आता ट्वीटरवर (Twitter) #ArrestUddhavThackrey ट्रेंड होत आहे. याच कारण ठरलय ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM UddhavThackrey) यांनी दसरा मेळाव्यात (Dasara Melava) केलेलं वक्तव्य.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना (Shivsaink) संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची..’

- Advertisment -

ताज्या बातम्या