Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत चाचण्या घटवल्या

औरंगाबादेत चाचण्या घटवल्या

औरंगाबाद : Aurangabad

मागील दोन महिने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले होते. मात्र आता मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. शहरात गुरुवारी दि.13 केवळ 216 रुग्ण निघाले. नव्याने आढळणार्‍या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी केंद्रावर होणारी गर्दी अलीकडे कमी झाली आहे. परिणामी, पूर्वी पाच हजार चाचण्या होत होत्या, त्याजागी आता रोजच्या तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने अधिकाधिक व्यक्तींच्या कोरोना चाचण्या आणि लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत केले. या उपाययोजनांमुळे आता शहरातील रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. सरकारी कार्यालयात येणारे अभ्यागत, शहराच्या एन्ट्री पॉइंटवर पर जिल्ह्यातून येणारे प्रवासी, संचारबंदीच्या काळात शहरात फिरणारे नागरिक व विमानतळ, रेल्वेस्टेशन येणार्‍या प्रवाशांची मागील काही महिन्यांपासून रोज चाचणी केली जात आहे.

शहराच्या एन्ट्री पॉइंटसह इतर ठिकाणी होणार्‍या अ‍ॅन्टीजेन चाचणीतून पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले जा आहे. त्यामुळे संसर्गाला ब्रेक लागला आहे. दररोज निघणार्‍यांची संख्या मध्यंतरी एक हजारापर्यंत गेली होती, त्याजागी आता अडीचशे ते तिनधे बाधित निघत आहेत. बाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाच चाचण्यांचे प्रमाण देखील घटले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात संसर्गाचा उद्रेक झाला, तेव्हा पालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांच्या रांगा दिसून येत होत्या. मात्र सध्या चाचणी केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पालिकेकडून पाच हजारांपेक्षा अधिक चाचण्या दररोज केल्या जात होत्या. मात्र आता ही संख्या तीन ते साडेतीन हजारांवर आली आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात शहरात पालिकेचे कोविड केअर सेंटर्स, सरकरी, खासगी रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड शिल्लक नव्हते. मात्र आता चित्र उलटे आहे. रुग्ण घटल्यामुळे पालिकेचे 21 पैकी 11 कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे. रुग्णांची संख्या घटल्याने एप्रिल महिन्यात 33 टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्ह रेट आता 12.21 पर्यंत खाली आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या