Friday, November 15, 2024
Homeनगरआदिवासी भागात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

आदिवासी भागात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

राजूर |वार्ताहर| Rajur

तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानींचे पंचनामे करून तातडीने आदिवासी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, तुकाराम खाडे यांनी केली आहे.

- Advertisement -

आदिवासी पट्ट्यातील रतनवाडी, घाटघर, पाचनई, अंबित, एकदरे, शेणित, देवगाव, पिंपरकणेसह सर्व भागांत तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टीमुळे नदीनाले पाण्याच्या पुरामुळे भरून वाहत आहेत. या पुरामुळे वारंघुशी, डावखांडी येथील रस्त्यावरील छोटे पूल वाहून गेल्याने वाडी-वस्तीच्या जनतेचे हाल झाले आहे. तर भात शेतीचे बांध फुटले आहे. मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी आदी गावांसह शिंगणवाडी, जहागिरदारवाडी, बारीसह भंडारदरा पाणलोटक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात भातशेती, घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे.

याबाबत माजी आमदार वैभव पिचड यांना माहिती दिली असता त्यांच्यावतीने तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, गटविकास अधिकारी विकास चौरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, तुकाराम खाडे, उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, अशोक भोजणे, तुकाराम सारूक्ते, मच्छिंद्र खाडे, सुभाष बांडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड, सागर रोंगटे, पांडुरंग पद्मेरे, दीपक भागडे आदिंसह शेतकर्‍यांनी केली आहे. त्यावरुन तहसीलदार डॉ. मोरे यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या