Saturday, July 27, 2024
Homeनाशिकआदिवासी बांधवांनी शिक्षणास प्राधान्य द्यावे

आदिवासी बांधवांनी शिक्षणास प्राधान्य द्यावे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

प्रकृती पूजक असलेला आदिवासी समाज इतर सर्व समाजात आदरास पात्र ठरला आहे. न्याय हक्कासाठी संघर्ष करत उपेक्षित आदिवासी समाजाला ( tribal community ) सामाजिक प्रवाहात आणण्याचे महत्वपुर्ण कार्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांनी केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आदिवासींनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास सर्वोच्च प्राधान्य देणे (give priority to education )काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन भाजप आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष देविदास कुंवर यांनी येथे बोलतांना केले.

- Advertisement -

येथील भाजप जिल्हा कार्यालयात क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, आदिवासी नेते देविदास कुंवर यांच्या हस्ते करण्यात येवून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना कुंवर बोलत होते. पं.स. सदस्य अरूण पाटील, उद्योग आघाडी प्रदेश समन्वयक रविष मारू, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय काळे, सुधीर जाधव, दीपक देसले, योगेश पाथरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपेक्षित आदिवासी समाज सामाजिक प्रवाहात यावा या दृष्टीकोनातून क्रांतीकारक बिरसा मुंडा यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज देखील खावटीसह अनेक न्याय हक्काच्या लाभासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. शिक्षणापासून लांब राहिल्यामुळे समाजास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षणाअभावीच आदिवासी समाज विकासापासून वंचित राहत आहे. त्यामुळे शिक्षणाशिवाय दुसरा प्रगतीचा पर्याय नसल्याने आदिवासींनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय करावे, असे आवाहन कुंवर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

सांस्कृतीक वेगळेपण राहिलेल्या आदिवासी समाजाचे निसर्गावर असीम प्रेम व मानवतेबद्दल असलेली श्रध्दा व प्रामाणिकपणा आदी गुणांचा गौरव केला पाहिजे. हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी या उद्देशाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असल्याची माहिती देत जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी आदिवासी समाजाचे प्रश्न सुटावेत या दृष्टीकोनातून पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी बोलतांना दिली. पं. स. सदस्य अरूण पाटील यांनी आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या रूपाने आदिवासी समाजाच्या एका उच्चशिक्षित महिलेला केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास एस.सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरे, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष सतिश उपाध्ये, बाळासाहेब सावकार, राहुल पाटील, कुणाल पाटील, बापू सूर्यवंशी, प्रकाश मुळे, गोविंद राजपूत, महेश जाधव, पप्पू पाटील, शक्ती सौदे, निखिल सोनार, स्वप्नील भदाणे, प्रणित पवार, समाधान बच्छाव, नचिकेत वाघ आदी कार्यकर्त्यांसह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक संजय काळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या